अभिनेता शंतनू गंगणे भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी
प्रदेशाध्यक्ष अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी शंतनू गंगणे यांची केली भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती
भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ च्या प्रदेशाध्यक्ष अभिनेत्री माननीय प्रियाताई बेर्डे यांनी अभिनेता आणि कार्यकारी निर्माता शंतनू गंगणे यांची भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली. शंतनु मुळचे तुळजापूरचे असुन पुणे आणि मुंबईमध्ये त्यांचे वास्तव्य असते. गेली अनेक दशके ते विविध सिनेमे, मालिकांमध्ये सातत्याने अभिनय करत आहेत. निमिर्ती आणि दिग्दर्शन क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. त्यांचा जनसंपर्क तगडा असून आपल्या विविध चाहत्यांसोबत ते सातत्याने संपर्कात असतात. त्यांच्या याच अभिनय क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल घेत भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक आघाडी प्रकोष्टच्या प्रदेशाध्यक्ष अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी पुणे जिल्ह्याच्या महत्त्वाच्या अशा उपाध्यक्षपदी शंतनू गंगणे यांची निवड केली.
ही जबाबदारी समर्थ आणि सक्षमपणे पार पाडण्याच काम ते करतील असा त्यांनी विश्वास दाखवला. पुणे जिल्ह्यातील कलाकारांच्या अडचणी सोडवणे आणि चित्रपट निर्मिती ते प्रदर्शनासाठी येणाऱ्या अडचणी सरकार स्तरावरून निवारण करणे हा प्रमुख उद्देश मनाशी ठेवून शंतनु गंगणे यांनी या पदाचा स्वीकार केला आहे असे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले