Uncategorisedबातम्या

महिला लिव्ह इन पार्टनरसोबत लॉजवर गेली, नंतर पतीही धडकला; पण दरवाजा उघडताच सर्वजणच हादरले

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजी चौकात असलेल्या साईलीला या हॉटेलमध्ये आपल्या लिव्ह इन जोडीदारासोबत आलेल्या एका ४७ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली. या घटनेनंतर महिलेसोबत हॉटेलमध्ये वास्तव्य असणारा जोडीदार फरार झाला असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिरा रोड येथे वास्तव्यास असल्याचा पुरावा दाखवत २४ जूनपासून हे लिव्ह इन जोडपे साईलीला हॉटेलमध्ये राहत होते. मात्र शुक्रवारी सकाळी हॉटेलच्या एका खोलीमध्ये एक महिला मृतावस्थेत आढळल्याची खबर शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. या महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहणारा तिचा जोडीदार मात्र एक दिवस अगोदरच हॉटेलमधून फरार झाल्याची माहिती पोलिसांना घटनास्थळी मिळाली. शहाजहान अख्तर असे या मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला ही लग्नानंतर पतीला सोडून दुसऱ्या एका पुरुषासोबत गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र त्यांचा पत्ता कोणालाच लागत नव्हता. अशातच अंबरनाथमधील लॉजमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचं कळताच मयत महिलेचा पती आणि तिची बहीण यांना संशय आल्याने ते या लॉजवर पोहोचले. तेव्हा त्यांनी लॉजमध्ये विचारणा केली असता, लॉजच्या माहिती पुस्तकात सदर महिलेचे नाव दिसले. तेव्हा ही महिला राहत असलेल्या रूमचा दरवाजा लॉज चालक याने ठोकला असता आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे लॉज चालकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. या लॉज चालकाने दुसऱ्या चावीने सदर रूम उघडल्यानंतर हीमहिला मृतावस्थेत पोलिसांना आढळली.

दरम्यान, पोलिसांनी तिचा मृतदेह उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. सदर महिलेचा मृत्यू आजाराने झाल्याचे शवविच्छेदनात नमूद करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली. मात्र, व्हिसेरा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूबाबत आणखी स्पष्टता येईल, असेही त्यांनी सांगितले. पोलिस या महिलेच्या जोडीदाराचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}