जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र दत्ताराम वायकर यांच्या मातोश्री श्रीमती पार्वती दत्ताराम वायकर यांचे शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी अल्पशः आजाराने निधन झाले. सेव्हन हिल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर स्व. राजेश्वर रागिणवार हिंदु स्मशानभुमी, प्रतापनगर येथे अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार गजानन किर्तीकर, आमदार व विभागप्रमुख सुनिल प्रभू, आमदार ऋतुजा लटके, उपायुक्त रणजित ढाकणे, के (पूर्व) मनपा कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मनिष वळुंज, शिधावाटप कार्यालयाचे अधिकारी अश्विन रोहीणीकर, माजी नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यांचे अधिकारी, एमआयडीसीचे वाहतुक अधिकारी घुगे, समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार वायकर यांची भेट घेऊन सांत्वन केले.
Check Also
Close