युकेच्या डॉ श्रुतिका यांचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदेसोबत काय आहे नाते ?
मराठमोळ्या श्रुतिकाने परदेशामध्ये मिळवलेल्या यशाबद्दल महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव
मराठमोळ्या श्रुतिकाने परदेशामध्ये मिळवलेल्या आपल्या शैक्षणिक यशाने महाराष्ट्राचा झेंडा डौलाने फडकावला आहे.
डॉ. श्रुतिका विजय सूर्यवंशी ह्या मूळच्या मुंबईच्या. त्यांनी मुंबईतून BDS पदवी प्राप्त केल्यानंतर त्या युके येथे पुढील उच्च शिक्षणाकरिता रवाना झाल्या. डॉ. श्रुतिका यांचे वडील, विजय सूर्यवंशी हे बेस्ट उपक्रमाच्या ‘बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाचे’ “सरचिटणीस – कला”, मराठी नाट्य कलाकार संघाचे “प्रमुख कार्यवाह” आणि मराठी नाट्य व्यवस्थापक संघाचे “उपाध्यक्ष” म्हणून देखील कार्यरत आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे “नियामक मंडळ सदस्य” ह्या पदावर नुकतीच निवड झालेले श्री. विजय सूर्यवंशी यांची कन्या डॉ. श्रुतिका विजय सूर्यवंशी हिने ‘रॉबर्ट गाॅर्डन युनिव्हर्सिटी’ आबर्डीन (युके) येथून “पब्लिक हेल्थ अँड हेल्थ प्रमोशन” यामध्ये नुकतीच मास्टर्स डिग्री संपादन केली, कलाक्षेत्राचे संस्कार असणाऱ्या डॉ श्रुतिका ह्या सुस्पष्ट आणि उत्तम मराठी बोलतात आणि मराठीचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. संपूर्णमहाराष्ट्रामध्ये ह्या मराठी कन्येचे कौतुक होत आहे, पदव्युत्तर डिग्री उत्तम यशाने संपादन केल्याबद्दल डॉ श्रुतिकाचे मनःपूर्वक अभिनंदन. तिने मिळवलेल्या यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून सूर्यवंशी कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.