पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापक अब्दुलमजीद हुसेनसो मुल्ला यांना जयवंत मालणकरांच्या प्रेमाने गहिवरून आले. मुख्याध्यापकांनी जयवंत मालणकर यांच्याबद्दल व्यक्त केलेली मुलाखत अगदी जशीच्या तशी –
जयवंतराव मालणकर हे गवाणे गावचे मुंबईकर ग्रामस्त. गवाणे गाव व मुंबईमध्ये होणार्या सर्व कार्यक्रमात सदैव पुढे असणारे. ग्राम विकास मंडळ, मुंबई चा गेल्या 15 वर्षांपासून सक्रिय सदस्य, भांडुप सुवर्णकार संघ उपाध्यक्ष, भांडुप दैवज्ञ समाज ( रजि ) कार्याध्यक्ष,
दरवर्षी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, अन्नधान्य वाटप,सणासुदीला आर्थिक मदत देणे. राजकीय नेत्याशी सलोख्यांचे संबंध, शैक्षणिक संस्थाशी जवळचे संबंध . गावातील मंदिर तसेच प्राथमिक शाळा किंवा माध्यमिक शाळा यांच्याशी संबंधित कोणत्याही कामात नेहमी पुढे असणारा हा शिक्षणावर प्रेम करणारा शैक्षणिक , सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात चौफेर विहार असलेला नवयुवक !! अलिकडे मुंबई दादर येथील दैवज्ञ हितवर्धक समाज या संस्थेवर विश्वस्त म्हणून पाच वर्षांकरिता बिन विरोध निवड झाली आहे. माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला जयवंतरावांना उपस्थित राहता आले नाही. याबद्दल त्यांच्या मनात खंत होती. मला तशी खंत त्यांनी बोलून देखील दाखवली होती. आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून गवाणे गावी येऊन माझा शाल , श्रीफळ ,पुष्पगुच्छ व मिठाईचा बॉक्स देऊन सत्कार केला.यावेळी त्यांच्या सोबत गवाणे गावचे मुंबईकर ग्रामस्थ विजय गोरुले उपस्थित होते. माझ्यावरील या निर्मळ प्रेमाबद्दल मालणकर परिवारास मनःपूर्वक धन्यवाद !!
—अब्दुलमजीद हुसेनसो मुल्ला.