कणकवलीचे सुप्रसिद्ध सुवर्णकार व्यावसायिक गणेश तळगावकर यांनी नवी कोरी मारुती एर्टिगा खरेदी केल्याचे आमदार नितेश राणे यांना समजले. आपल्या जवळच्या सहकाऱ्याने कार खरेदी केल्याबद्दल आ नितेश राणे यांनी तळगावकर यांचे अभिनंदन केले व त्यांना बंगल्यावर कौतुक करण्यासाठी आमंत्रित केले. गणेश तळगावकर कणकवलीत ओम गणेश ह्या आमदार नितेश राणे यांच्या निवासस्थानी आले असता नितेश राणे यांनी आपुलकीने गणेश तळगावकर कुटुंबीयांची विचारपूस करून त्यांचे अभिनंदन केले. कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी होत असताना नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार नवीन कारमध्ये गाडीमध्ये बसून एक छान सफर केली व गाडीची संपूर्ण माहिती घेतली. आमदार नितेश राणे ह्या गाडीमध्ये बसल्यामुळे आता आपली गाडी हि विशेष झाली असल्याची भावना गणेश तळगावकर यांनी बोलून दाखवली. आपल्या कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी होणारा नेता म्हणून नितेश राणे यांचा संपूर्ण कोकण वासियांना अभिमान आहे आणि त्यामुळेच मतदारसंघातील मतदार नितेश राणे यांना आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य समजतो. आमदार नितेश राणेंच्या ह्या कृतीने संपूर्ण मतदार संघामध्ये उत्साहाची लहर आहे.
Check Also
Close