प्रतिनिधी – डॉ ओंकार विकास कारेकर यांना नीट – एम डी एस २०२३ ह्या परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी करून ११ वा क्रमांक पटकावल्याबद्दल आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा बोर्ड आयोजित भव्य कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय, केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल आणि डॉ भारती पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कठोर परिश्रम आणि सखोल अभ्यास करून डॉ ओंकार यांनी हे यश मिळविले आहे. ओंकार हे प्रथितयश सुवर्णकार आणि दैवज्ञ समाजाचे पदाधिकारी श्री अनिल कारेकर यांचे पुतणे आहेत. डॉ ओंकार यांच्या यशाबद्दल संपूर्ण दैवज्ञ समाजातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Check Also
Close