नामदार नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस नामकरणसंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.रावसाहेब दानवे यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषद व ना.जगन्नाथ (नाना)शंकरशेट प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पुन:श्च भेट घेऊन पूर्वी दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा मंत्रीमहोदयांनी करून दि.३१ जुलै २०२३ या ना.नानांच्या १५८ व्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून घोषणा करावी असा शिष्टमंडळातर्फे आग्रह धरण्यात आला त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे आश्र्वासित मंत्री महोदयांनी केले
समाजश्रेष्ठी सुरेंद्र शंकरशेट, समाजश्रेष्ठी डॉ.गजानन रत्नपारखी, समाजश्रेष्ठी दिनकर बायकेरीकर, सरचिटणीस ॲड.मनमोहन चोणकर,चंद्रशेखर दाभोळकर यावेळी उपस्थित होते. रेल्वे बोर्डाचे सदस्य श्री.कैलाश वर्माही याप्रसंगी उपस्थित होते.त्यांनी भेट घडवून आणण्यात पुढाकार घेतला.
नंतर भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांचीही शिष्टमंडळाने भेट घेतली.त्यांनी नाना शंकरशेट नामकरण व नाना शंकरशेट स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.