राष्ट्रीय

दैवज्ञ हितवर्धक समाज, दादर संस्थेतर्फे मंगळवार दि.15 ऑगस्ट,2023 रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

दैवज्ञ हितवर्धक समाज, दादर या संस्थेतर्फे मंगळवार दि.15 ऑगस्ट,2023 रोजी ध्वजवंदन, श्री सत्यनारायण पूजा आणि सायंकाळी नाम. जगन्नाथ तथा नाना शंकरशेट पुण्यस्मरण आणि समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. या कार्यकमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्याचे निमंत्रण अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष, समाजश्रेष्टी डॉ. गजानन रत्नपारखी यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष हरचेकर आणि विश्वस्त श्री. नंदकिशोर वळीवडेकर यांनी डॉ. रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट सेंटर येथे नेऊन दिले. डॉक्टर रत्नपारखी यांनी निमंत्रण स्वीकारले आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. हरचेकर यांना शाल आणि पुष्पगुछ देऊन सन्मानित केले. सदर कार्यक्रमात सालाबाद प्रमाणे दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता संस्थेच्या हरी महादेव वैद्य सभागृहात नाना शंकरशेठ पुण्यस्मरण आणि विद्यार्थी गुणगोरव समारंभ आयोजित करण्यात आला असून शालांत परीक्षेत ७५% व उच्च माध्यमिक परीक्षेत ७०% पेक्षा अधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या तसेच शिष्यवृत्ती ,पदवी व पदवीधारक विद्यार्थ्यांना सन्माननीत करण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची प्रत दिनांक ७ ऑगस्ट २०२३ पुर्वी कार्यालयात अथवा पुढील विश्वस्तांकङे पाठवण्याची व्यवस्था करावी.
कार्यालय – दैवज्ञ हितवध॔क समाज दादर,पदमाबाई ठक्कर मार्ग, कोहिनूर स्क्वेअर जवळ, दादर पश्चिम, मुंबई २८.
कार्यालयीन वेळ – सकाळी १० ते रात्री ८,शुक्रवार बंद.
फोन नं.- ०२२- ३१८४१६९४
मो.नं – ७९७७८१८१८९
संपर्क
अध्यक्ष – सुभाष हरचेकर – ९८२०८३३७१०
उपाध्यक्ष – जगदीश कशेळकर- ९८६९३१८८७४
चिटणीस – संजय नागवेकर – ९८९२६०६०७९
सहचिटणीस – सुनिल धामणेकर – ९८९२८७३१७६
खजिनदार – संजय पितळे – ९३२३७०६८४०
सहखजिनदार-अरुण आङवणकर-९७५७०१८८६९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}