Uncategorisedशैक्षणिक
दिनांक ३१ जुलै रोजी १५८ व्या पुण्यतिथी निमित्त नामदार नाना शंकरशेट यांच्या शिल्पाचे अनावरण सोहळ्याचे आयोजन
मुंबई सुवर्णकार संघ (मालाड विभाग), मालाड सुवर्णकार संघ व श्री.मालाड दैवज्ञ समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई नगरीचे आद्य शिल्पकार व भारतीय रेल्वेचे जनक नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या १५८ व्या पुण्यतिथी सोमवार दिनांक ३१ जुलै रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता नाना चौक ,तुरेल पाखाडी मार्ग,मदर्स बेकरी जवळ ,मालाड (प) मुंबई नंबर. ४०००६४ येथे नामदार नाना शंकरशेट यांच्या शिल्पाचे अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदरहू कार्यक्रमास सुवर्णकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.