युवा विभागातर्फे पावसाळी वर्षा सहलीचे दिनांक २९ जुलै २०२३ रोजी आयोजन
अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषद युवा विभागातर्फे सालाबाद प्रमाणे याही वर्षी एक दिवसीय पावसाळी वर्षा सहलीचे आयोजन दिनांक २९ जुलै २०२३ रोजी शनिवारी केले आहे. ज्ञातीतील युवा बांधवांनी सदर सहलीमध्ये सहभागी होऊन सहलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन युवा विभागाचे प्रमुख विशाल कडणे यांनी केले आहे. सदर सहली दरम्यान विशेष स्पर्धांचे आयोजन केले असून त्यासाठी माननीय समाजश्रेष्ठी डॉ गजानन रत्नपारखी यांनी विशेष पारितोषिके देखील सुचविली आहेत. अतिशय नाममात्र दरात ह्या सहलीचे आयोजन केलेले असून त्यात प्रवास खर्च, जेवण, चहा नाश्ता, वॉटर पार्क प्रवेश फीचा समावेश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सहलीचे स्थळ : शांती सागर रिसोर्ट अँड वॉटरपार्क, अंबरनाथ. https://g.co/kgs/5iTkQf
सहलीसाठी प्रवेश फी : रू १०००/- प्रत्येकी त्यात (वॉटरपार्क प्रवेश फी, नाश्ता २ वेळ, दुपारचे जेवण, २ x २ पुशबॅक बसने प्रवास सहीत)
अधिक माहितीसाठी संपर्क :
ओंकार जामसांडेकर –
+91 97735 23056
सौरभ नागवेकर –
+918692062069
चिन्मय पितळे –
+919320001818