Uncategorised
आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये गणेश तळगावकर यांचा वाढदिवस साजरा
अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद युवा विभागाचे कार्यकारिणी सदस्य व कणकवली येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक गणेश तळगावकर यांचा आज वाढदिवस आहे. कणकवली येथे दैवज्ञ ज्ञाती बांधवांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त गणेश तळगावकर यांनी कणकवलीचे आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. सदर भेटीदरम्यान आ नितेश राणे यांनी गणेश यांचे कौतुक केले व शुभाशिर्वाद दिले. गणेश तळगावकर यांची अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद युवा विभागाच्या कार्यकारिणी सदस्य पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल आ. नितेश राणे यांनी गणेश यांना शुभेच्छा दिल्या.