अखिल भारतीय दैवज्ञ समाजोनत्ती परिषदेच्या रिक्त झालेल्या युवा विभागप्रमुख पदी डॉ. विशाल कडणे यांची नेमणूक झाली. त्यानंतर युवा विभागाच्या कार्यकारणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडी ह्या बिनविरोध पार पडल्या. सदर नियुक्ती करताना समाजश्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी, परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर आणि सरचिटणीस चंद्रशेखरजी दाभोळकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असे युवा विभागाचे प्रमुख विशाल कडणे यांनी सांगितले. सदर युवा विभागाच्या कार्यकारिणी सदस्य पदी गणेश तळगावकर या कणकवलीच्या युवा सुशिक्षित व्यक्तिमत्वाची नियुक्ती झाली आहे. गणेश तळगावकर हे सुवर्णकार असून त्यांचा ज्वेलरी शोरूम कणकवली येथील बाजारपेठेमध्ये आहे. गेली आठ ते दहा वर्षे ते राजकीय क्षेत्रात सक्रिय असून कणकवली तालुक्याचे भाजपा पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत व सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने धडाडीचे काम करत असून त्यांच्या याच कार्याची दखल युवा विभागाने घेऊन त्यांना कार्यकारिणी सदस्य पदाची जबाबदारी दिल्याचे कळते. गणेश तळगावकर यांना पुढील वाटचालीसाठी त्यांच्या समाजाकडून आणि कुटुंबाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. त्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गणेश तळगावकर यांच्या नियुक्तीने कणकवलीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.