नामदार नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस नामकरण व वडाळा येथील भूखंडावरील स्मारक पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख मा. राजसाहेब ठाकरे यांना समाजश्रेष्ठी डॉ.गजानन रत्नपारखी, उपाध्यक्ष डॉ.आनंद पेडणेकर आणि सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर यांनी निवदेन दिले. मा.राजसाहेबांनी मा.गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलून नामकरणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. नामदार नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस नामकरण व वडाळा येथील भूखंडावरील स्मारक पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख मा.राजसाहेब ठाकरे यांना समाजश्रेष्ठी डॉ.गजानन रत्नपारखी, उपाध्यक्ष डॉ.आनंद पेडणेकर आणि सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर यांनी निवदेन दिले. राजसाहेबांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलून नामकरणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाना शंकर शेट टर्मिनस नामांतरण करण्याच्या मागणीने आता जोर धरला असून दैवज्ञ समाजाने आता त्याबाबाबत जहाल भूमिका घेतली आहे असे दैवज्ञ समाजाचे उपाध्यक्ष डॉक्टर आनंद जगन्नाथ पेडणेकर यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या रेल्वे विभागाच्या अनेक विविध स्तरांवरील बैठकांमध्ये सातत्याने फक्त आश्वासनच मिळत असल्याने दैवज्ञ समाजाने आता थेट केंद्रीय मंत्र्यांसोबत बैंठकांचा सिलसिला सुरु केला आहे. त्याच्या पाठपुरावासाठी दैवज्ञ समाजाचे शिष्टमंडळ आता थेट दिल्लीलाच ठीय्या मांडणार असून त्याबाबतच्या बैठकांचा सर्व तयारी पूर्ण झालेली आहे अशी माहिती सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर आज दैवज्ञ समाजाच्या शिष्टमंडळाने राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. संसदेच्या अधिवेशनादरम्यान सदरील नामांतरणाचा विषय मा. गृहमंत्री अमित शाह आणि रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या दरबारी प्रकर्षाने लावून धरून लवकरात लवकर त्यावर कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांना निवेदन दिले.
Check Also
Close