बातम्या
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना जामीन मंजूर ?
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर झाला आहे. डी. एस. कुलकर्णीं तब्बल ५ वर्षांनी तुरुंगातून बाहेर आले आहे. महंत सुधीरदास यांच्यासोबत भेटीचे समोर आल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी फेब्रुवारी २०१८ मध्ये बांधकाम व्यावयासिक डी.एस.कुलकर्णी, त्यांच्या पत्नी, मुलगा, मेव्हणे, जावई आणि इतर काही जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात डी.एस. कुलकर्णी यांना पाच वर्षानंतर जामीन मिळाला आहे. गेल्या पाच वर्षात कुलकर्णी यांनी ठेवीदारांना एकही रुपये मिळाले न दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, कुलकर्णी यांना ज्या कायद्याअंतर्गात अटक झाली, त्या कायद्यांतर्गतच आोरोपींना किती कळ तुरुंगात ठेवता येतं? हे पाहून न्यायालयाने या प्रकरणात अडकलेल्या सर्वांना जामीन मंजूर केला, अशी माहिती मिळत आहे.