वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या सविस्तर
क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसी (ICC) नं नुकतच वनडे वर्ल्ड कप 2023 चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 5 ऑक्टोबर २०२३ पासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळला जाणार आहे. तर बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
वनडे वर्ल्ड कपचा पहिला सामना आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तर या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने कोलकत्ता आणि मुंबई मध्ये खेळले जातील. या स्पर्धेमध्ये एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत.
दरम्यान, टीम इंडियातील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या अनेक दिवसापासून श्रेयस दुखापतीला झुंज देत आहे. त्याच्या दुखापतीत वाढ झालेली असून त्याला आशिया चषक स्पर्धा 2023 आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागू शकते.