दहीर्जेमधील आदिवासी विद्यार्थ्यांना गुरुकृपा फाउंडेशनचा मदतीचा हात
डॉ. गजानन रत्नपारखी यांच्याकडून दीड लाखाहून अधिक रकमेच्या शैक्षणिक साहित्याची मदत
सोमवार दिनांक 21/ 8 /2023 रोजी जि. प.शाळा देहेर्जे ता.विक्रमगड येथे गुरुकृपा हार्ट फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट अंधेरी यांच्याकडून २६१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दहीर्जेमधील आदिवासी विद्यार्थ्यांना गुरुकृपा फाउंडेशनचा मदतीचा हात मिळाला. आदिवासी चेहऱ्यांवर स्मित हास्य उजळले होते. मराठी अंकलीपी , इंग्रजी अंक लिपी , एक रेघी वह्या , दुरेघी वह्या ,चाररेघी वह्या ,स्क्वेअर वह्या ,चित्रकला वह्या ,कंपास पेटी , दप्तर इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गुरुकृपा हार्ट फाउंडेशन. ट्रस्टचे डॉ. गजानन रत्नपारखी,डॉक्टर श्री.राम चव्हाण यांच्याकडून सुमारे 1,50,000/ – रुपये रकमेच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुलजी पाटील यांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.रमेश घाटाळ, श्री. भगवान कुरकुटे सर उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री आत्माराम हरड सर यांनी प्रास्तावित केले तर श्री.संजय सांबरे सर यांनी सूत्रसंचालन केले.