मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणांची सुनावणी आता आसाम न्यायालयांत
गेल्या काही दिवसांत मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी दाखल खटल्यांची सुनावणी आसाम मध्ये घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणांचा तपास केंद्रिय अन्वेषण विभागानं केला आहे. हिंसाचार पिडीत आणि आणि साक्षीदारांच्या सुरक्षा आणि सुनावणीदरम्यान अडथळा टाळण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं मणिपूरच्या हिंसाचारानंतर दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवरील सुनावणीनंतर हा अंतरिम आदेश जारी केला. या प्रकरणांची सुनावणी करताना गुवाहाटी उच्च न्यायालयाला मणिपूरमध्ये वापरल्या जाणार्याच एकापेक्षा जास्त भाषा बोलणारे न्यायाधीश निवड करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. गुवाहाटी न्यायलयांत होणाऱ्या या सुनावणीदरम्यान मणिपूर राज्य सरकारनं दुरस्थ पध्दतीनं होणाऱ्या सुनावणीदरम्यान पुरेशी इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन द्यावी असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 सप्टेंबरला होणार आहे.