स्पोर्टस
हॉकीच्या पाच एस प्रकारच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारताचा महिला संघ पात्र
हॉकीच्या पाच एस या जलद प्रकारातील आशियाई स्पर्धेच्या विश्वकरंडक पात्रता स्पर्धेत भारताच्या महिला संघानं काल थायलंडला पराभूत केलं. त्यामुळे मस्कतमध्ये पुढच्या वर्षी 24 ते 27 जानेवारी या काळात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारताचा संघ पात्र ठरला आहे. ओमानमधील सालालाहमध्ये काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं थायलंडवर 7-2 असा विजय मिळवला. मारियाना कुजूरनं केलेले दोन गोल सामन्यासाठी निर्णायक ठरले. दीपी मोनिका टोप्पो, ज्योती, नवज्योत कौर आणि महिमा चौधरी यांनीही गोल केले. पाच एस हा हॉकीतील जलद प्रकार असून, त्यात प्रत्येक संघातील पाच खेळाडू भाग घेतात.