शैक्षणिक
राज्याच्या आरोग्य विभागात 10 हजारांहून अधिक पदांची भरती होणार
राज्यात गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार असून, १० हजार ९४९ पदांची भरती केली जाणार असल्याचं आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. या भरती प्रक्रियेत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गात विविध ६० प्रकारच्या पदांचा समावेश आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस – टीसीएस मार्फत राबवली जाणार असल्याचं, सावंत यांनी सांगितलं.