मयंका वैभव भुर्के यांची अ. भा. दै. स. प. युवा विभागाच्या उपप्रमुख पदी निवड
तरुण आणि तडफदार युवतीकडे उपप्रमुख पदाची जबाबदारी
अखिल भारतीय दैवज्ञ समाजोनत्ती परिषदेच्या रिक्त झालेल्या युवा विभागप्रमुख पदी डॉ. विशाल कडणे यांची नेमणूक झाली. त्यानंतर युवा विभागाच्या कार्यकारणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडी ह्या बिनविरोध पार पडल्या. सदर नियुक्ती करताना समाजश्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी, परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर आणि सरचिटणीस चंद्रशेखरजी दाभोळकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असे युवा विभागाचे प्रमुख विशाल कडणे यांनी सांगितले. सदर युवा विभागाच्या उपप्रमुख पदाची जबाबदारी ही प्रथमेश बेळलेकर या भांडुपच्या युवा आणि सुशिक्षित नेतृत्वाकडे देण्यात आली आहे. प्रथमेशसोबतच मयंका वैभव भुर्के ह्या तरुण आणि तडफदार युवतीकडे उपप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मयांका ह्या उच्चशिक्षित असून त्या आपल्या तडफदार आणि धडाडीच्या स्वभावाच्या कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध आहेत. गेली ३ ते ५ वर्षे मयंका सातत्याने दैवज्ञ चषक, दैवज्ञ गरबा, मोफत अन्नधान्य वाटप, गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आरोग्य विभाग इत्यादी सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने धडाडीचे काम करत असून त्यांच्या याच कार्याची दखल युवा विभागाने घेऊन त्यांना उपप्रमुख पदाची जबाबदारी दिल्याचे कळते. मयंका वैभव भुर्के यांना पुढील वाटचालीसाठी त्यांच्या समाजाकडून आणि कुटुंबाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. त्याप्रसंगी समाजश्रेष्ठी डॉ गजानन रत्नपारखी, उपाध्यक्ष डॉ आनंद दादा पेडणेकर, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर आणि युवा विभाग प्रमुख विशाल कडणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मयंका वैभव भुर्के यांच्या नियुक्तीने समस्त युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्याला दिलेल्या ह्या जबाबदारी बद्दल मयंकाने समाजश्रेष्ठी डॉ गजानन रत्नपारखी, उपाध्यक्ष डॉ आनंद दादा पेडणेकर, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर आणि युवा विभागाचे प्रमुख विशाल कडणे यांचे आभार मानले आहेत.