प्रतिनिधी – १३ ऑकटोबर हा आमदार प्रवीण दरेकर यांचा वाढदिवस. वाढदिवसादिवशी आपल्या नेत्याला काही तरी अनोखी भेट द्यावी ह्या निमित्ताने विशाल कडणे (संचालक – मुंबई हाऊसिंग फेडरेशन) यांनी प्रवीण दरेकर यांची प्रतिमा असलेला टपाल तिकीट बनविणेसाठी पोस्ट खात्याकडे निवेदन केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. विशाल कडणे यांना पोस्टाकडून प्रवीण दरेकर यांचा फोटो असलेला टपाल तिकीट जी पी ओ इथून १२ ऑकटोबर रोजी देण्यात आले. वाढदिवसाचे निमित्त साधून विशाल कडणे यांनी आज आपल्या नेत्याला ‘माय स्टॅम्प’ टपाल तिकिटाच्या स्वरूपात वाढदिवसाच्या अनोख्या अश्या शुभेच्छा दिल्या. आपले माय स्टॅम्प टपाल तिकीट पाहून प्रवीण दरेकर यांनी विशाल यांचे कौतुक केले. ह्यावेळी विशाल यांच्या सोबत विजय कडणे, समीर वेदक, राजेश सातघरे उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त प्रवीण दरेकर यांनी आपल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन केले हा क्षण आमच्या टीमने आपल्या कॅमेरामध्ये टिपला व प्रवीण दरेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Check Also
Close