‘मला फक्त लाज नाही…,’ महिलांसंबंधी विधानावर नितीश कुमारांनी मागितली माफी; केंद्रीय मंत्री म्हणाले ‘गटरछाप…’
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांच्या शिक्षणावर बोलताना आक्षेपार्ह विधान केलं आहे. महिलांचं शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रण यांची जोड लावताना त्यांनी असं काही म्हटलं ज्यामुळे विधानसभेत महिला आमदारांचीही मान शरमेने खाली झुकली होती. दरम्यान आपल्या या विधानावर त्यांनी माफी मागितली आहे. मी तर महिलांच्या शिक्षणावर बोललो होतो. मी असंच बोललो होतो, पण जर कोणी दुखावलं असेल तर मी माफी मागतो असं ते म्हणाले आहेत.
सभागृहात बोलताना नितीश कुमार यांनी महिलांच्या शिक्षणावर भर देत आहोत असं सांगितलं. “माझ्या एखाद्या विधानाने जर कोणी दुखावलं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. जर मी चुकीचं बोललो असेन तर मी वक्तव्य मागे घेतो. मी स्वत: स्वत:ची निंदा करत आहे. मला फक्त लाजच वाटत नाही आहे, तर मी दु:खही व्यक्त करत आहे,” असं नितीश कुमार म्हणाले. यादरम्यान विरोधी पक्षाचे आमदार सतत गदारोळ घालत होते.