मुंबई

वांद्रे स्थानकात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसमध्ये आढळला मृतदेह; सीसीटीव्हीत धक्कादायक माहिती समोर

मुंबईतील वांद्रे टर्मिनन्स स्थानकात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे.

मुंबईतील वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वांद्रे स्थानकात थांबलेल्या एका एक्स्प्रेसमध्ये एक 15 वर्षांचा मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. एक्स्प्रेसमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मुलगा अल्पवयीन असून त्याने आत्महत्या केली की हा घातपात आहे, याचा शोध घेतला जात आहे. (Mumbai Live News Today)

काय घडलं नेमकं?

मुंबई पोलिसांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटवण्यात आली नसून ही आत्महत्या आहे की घातपाताचा प्रकार आहे याचा शोध पोलिस घेत आहेत. रविवारी रात्री वांद्रे टर्मिनन्सच्या प्लॅटफॉर्म नंबर तीनवर देहरादून एक्स्प्रेस थांबली होती. या एक्सप्रेसच्या बोगी क्रमाक एस सातमध्ये एक अल्पवयीन मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सोमवारी या दुर्घटनेप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. पोलिसांना अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आलं नाहीये.

सीसीटीव्ही फुटेजची मदत घेणार 

तरुणासोबत नेमकं काय घडलं याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजची मदत घेतली आहे. तरुणाने गळफास घेतलेल्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतप पोलिसांच्या लक्षात आले की, गेल्या काही दिवसांपासून तो मुलगा त्याच परिसरात फिरत होता. मात्र, त्याने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून तरुणाच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे.

आपत्कालीन खिडकीने आत शिरला

सीसीटीव्ही फुटेजनुसार, तरुण वांद्रे टर्मिनन्समध्ये प्लॅटफॉर्मवर फिरताना दिसत होता. त्यानंतर स्थानकात उभ्या असलेल्या देहरादून एक्स्प्रेसमध्ये आत शिरला. एक्स्प्रेसचे सर्व दरवाजे बंद असल्याने तो आपत्कालीन खिडकीने आत शिरला. त्यानंतर काहीवेळाने आरपीएफ जवानाला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}