प्रतिनिधी – जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सुप्रसिद्ध निर्माते दिलीप जाधव यांच्या अष्टविनायक प्रकाशित आणि चिन्मय मांडलेकर लिखित दिग्दर्शित गालिब नाटकाचा गडकरी रंगायतन ठाणे येथे भव्य शुभारंभ झाला. दुपारी साडेचार वाजता सुरू झालेल्या नाटकास रसिक प्रेक्षकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती. पहिलाच प्रयोगास रसिक प्रेक्षकांचा उदंड मिळालेला प्रतिसाद बघून सर्व कलाकारांनी प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले. गालिब हे नाटक अतिशय संवेदनशील आणि एका महत्त्वाच्या अशा कादंबरी विषयावरती लिखित असून त्या नाटकाच्या माध्यमातून दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी अनेक विविध पैलूंना रसिकप्रेक्षकांसमोर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या नाटकांमध्ये गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी, गुरूराज अवधानी, अश्विनी जोशी आणि अन्य महत्त्वाच्या मराठी कलाकारांचा समावेश आहे. नाटक संपल्यानंतर नाटकासाठी प्रेक्षकांनी उदंड अशा शुभेच्छा कलाकारांना दिल्या, अनेक प्रेक्षकांनी कलाकारांची भेट घेऊन आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आणि पहिलाच प्रयोग हा इतक्या प्रचंड प्रतिसादाने यशस्वी झाल्याबद्दल सर्व कलाकारांनी नाटक संपल्यानंतर रसिक प्रेक्षकांचे टाळ्या वाजवून आभार व्यक्त केले
Related Articles
Check Also
Close
-
Ashok Saraf : अशोक सराफ यांचा फोटो टपाल तिकिटावर14 November 2023