वर्ल्ड कपमध्ये शमीची कामगिरी कशी वाटली? पत्नी हसीन जहाँ स्पष्टच म्हणाली, ‘मला फरक पडत नाही, की तो….’
मी टीम इंडियाला शुभेच्छा देईल, पण मी त्याला शुभेच्छा देणार नाही
भारतीय क्रिकेट संघाचा धुवांदार स्टार खेळाडू मोहम्मद शमी (Mohammad Shami) गेल्या काही दिवसात वैवहिक जीवन देखील खूप चर्चेत राहिलाय. पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) दाखल केलेल्या घरगुती हिंसाचारप्रकरणी कोलकात्याच्या अलीपूर न्यायालयाने शमीचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे शमी सध्या वर्ल्ड कप खेळताना दिसत आहे. वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) संधी मिळताच शमीने संधीचं सोनं केलं. मोहम्मद शमीने गेल्या 3 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. शमीच्या या कामगिरीवर सर्व क्रिकेट प्रेक्षक खूश असल्याचं पहायला मिळतंय. अशातच शमीची पत्नी हसीन जहाँ हिला जेव्हा शमीच्या कामगिरीवर विचारण्यात आलं, तेव्हा तिने काय उत्तर दिलंय पाहा…
मी कधी क्रिकेट बघत नाही. त्यामुळे मी कोणत्याही क्रिकेटर्सची फॅन नाही, तसेच मी क्रिकेटची देखील फॅन नाही. त्याने किती विकेट घेतल्या त्यातलं मला काही कळत नाही. तो चांगलं खेळतोय, त्यामुळे तो संघात टिकून राहिल. त्यामुळे त्याची कमाई देखील चांगली राहिल, त्यामुळे आमचं भविष्य सुरक्षित असेल. मी टीम इंडियाला शुभेच्छा देईल, पण मी त्याला शुभेच्छा देणार नाही, असं हसीन जहाँ म्हणाली आहे. शमी कसा खेळतो, तो फायनलमध्ये कसा खेळतो? मला त्याने फरक पडत नाही. लोक त्याला कसा समजतात, याने देखील मला फरक पडत नाही. मला ऐवढंच माहितीये की, तो माझा पती आहे आणि त्याने आम्हाला सांभाळायचं आहे, असं हसीन जहाँ म्हणाली आहे.