दैवज्ञ

ईशान्य मुंबईचा दैवज्ञ दांडिया २०२३ कार्यक्रम संपन्न

सिनेअभिनेता अशोक सराफ ,सविता मालपेकर, दैवज्ञ समाजश्रेष्ठी डॉ गजानन रत्नपारखी यांची प्रमुख उपस्थिती

प्रतिनिधी – ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित रास गरबा कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक २९ ऑक्टोबर रोजी आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते अशोक सराफ, किशोर महाबोले, शेखर फडके, अभिनेत्री सविता मालपेकर, आमदार अशोक पाटील, शिवसेना नेते यशवंत जाधव, चंद्रशेखर दाभोळकर व दैवज्ञ समाजाचे विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटन आमदार निरंजन डावखरे यांनी केले तर समारोप शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक दैनिक मुंबई तरुण भारत होते

सदर कार्यक्रमाचे आयोजन विशाल कडणे आणि ईशान्य मुंबई दैवज्ञ समाजाची संस्था ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केले होते सदर कार्यक्रमाला मुंबई विरार कर्जत ठाणे येथील मोठ्या संख्येने दैवज्ञ बांधव उपस्थित होते.

सदर कार्यक्रमादरम्यान अशोक सराफ ,सविता मालपेकर, दैवज्ञ समाजश्रेष्ठी डॉ गजानन रत्नपारखी यांच्या पोस्टाच्या टपाल तिकिटाचे अनावरण पार पडले. तर इंडियन आयडॉल फेम गुल सक्सेना, सारेगम फेम प्रणव देहेरकर, शिरीष देवरुखकर, देवेंद्र कांदळगावकर, सोनल खेडेकर या गायकांसह मान्यवर कलाकारांच्या वाद्य वृंदाचा बँड पथकाच्या तालावर एल ई डी स्क्रीनने सजवलेला दैवज्ञ रास गरबा कार्यक्रम सुरू झाला.

या कार्यक्रमाची सुरुवात हर्षिता हाटे यांच्या कथ्थक नृत्याने झाली. गाण्यातील बालकलाकारांच्या नृत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते सदर कार्यक्रमाला दैवज्ञ समाजाचे समाजाचे अध्यक्ष डॉ जगन्नाथ रत्नपारखी यांनी प्रमुख उपस्थिती लावली.

डॉक्टर जगन्नाथ रत्नपारखी हे दैवज्ञ समाजाचे प्रमुख आधारस्तंभ असून सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत.

कार्यक्रमांमध्ये सर्वांच आकर्षण होतं ते म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ. उपस्थित नामवंत व्यक्तींचा माननीय समाज श्रेष्ठींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास स्थानिक राजकीय आणि सामाजिक पुढार्‍यांनी विशेष उपस्थिती लावून दैवज्ञ समाजाला शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे आयोजन हे दैवज्ञ समाजाचे युवा नेते विशाल कडणे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली केले होते.
सदर कार्यक्रमध्ये मुलुंड दैवज्ञ समाज, दैवज्ञ ब्राम्हण समाज ठाणे या संस्थांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने ज्ञाती बांधवांनी उपस्थिती लावून कार्यक्रम यशस्वी केले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धेश बेळलेकर, वैभव भुर्के, स्वप्नील चोणकर, सुशांत रत्नपारखे, चिन्मय पितळे, राजेश सातघरे, हर्षिता हाटे, निमिषा घोसाळकर, जयवंत मालणकर, दिव्या पेडणेकर, शिरीष देवरुखकर, गौरव पोतदार, दीपक नार्वेकरइत्यादी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}