लातुरमध्ये अनेक मदरशे चालवणाऱ्या मौलानाकडून विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर जमावाने मौलानाला चांगलाच चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले.
मदरशात शिक्षण घेणाऱ्या मुलीचे मौलानाकडून वयाच्या ११ व्या वर्षापासून लैंगिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार लातुरात समोर आला आहे. या मुलीचे लग्नानंतरही शारीरिक शोषण करणाऱ्या मौलानाविरोधात लातूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २२ वर्षीय पीडित विवाहितेने तक्रार दाखल केली होती.