Ashok Saraf : अशोक सराफ यांचा फोटो टपाल तिकिटावर
भारत सरकारच्या टपाल विभागातून माय स्टॅम्प योजनेअंतर्गत अशोक सराफ यांचा फोटो असलेले टपाल तिकीट
अशोक सराफ यांचे नाव पद्मश्री पुरस्कारासाठी सरकारकडून सुचविण्यात आले आहे. त्यानिमित्ताने त्यांना एक अनोखी भेट देण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. भारत सरकारच्या टपाल विभागातून माय स्टॅम्प योजनेअंतर्गत अशोक सराफ यांचा फोटो असलेले टपाल तिकीट त्यांना देण्यात आले आहे. त्यासाठी भांडुप येथे टपाल तिकिट अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाचे आयोजन विशाल कडणे आणि ईशान्य मुंबई दैवज्ञ समाजाची संस्था ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केले होते
अशोक सराफ यांनी या सोहळ्यात व्यक्तव्य केले आहे. “हा मी माझा मोठा सत्कार समजतो. माझे चित्र असलेला स्टॅम्प प्रदर्शित करावा ही मोठी बाब आहे. त्यामुळे मला या गोष्टीचे कौतुक आहे. आता इमेलचा जमाना आहे. त्यामुळे स्टॅम्प कोण विकत घेणार हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे” असे अशोक सराफ मिळाले.
अभिनय क्षेत्राताली पद्मश्री पुरस्कार हा अशोक सराफ यांना मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारडे शिफारस केली आहे. त्यानंतर राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी घोषणा केली.