दैवज्ञबातम्या
Trending

मुंबईचे सुप्रसिद्ध “डॉ. गजानन रत्नपारखी”, रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित

राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रतिभा व बुद्धिमत्ते च्या माध्यमातून अनन्यसाधारण कार्य करणाऱ्या महिला – पुरुष व्यक्ति किंवा संस्थांची किर्ती जाणून घेऊन त्यांना पुरस्कृत करण्याचे कार्य रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ( RTBR ) द्वारा केले जाते

▪️वर्ल्ड सेव्हन वंडर्स पब्लिकेशन व रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड च्या फौंडर चीफ एडिटर पदावर असणाऱ्या अंतरराष्ट्रीय कीर्तिमान लेखक व भारत सरकार च्या पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकित विश्वविख्यात प्राकृतिक चिकित्सक डॉ. क्रांतिकुमार महाजन ह्यांच्या संकल्पने वर आधारित रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ( RTBR ) मधे चीफ एडज्यूकेटर ज्यूरी डॉ. एस. देवेंद्र, नॅशनल ज्यूरी मेम्बर डॉ. गुरतेज सिंग ब्रार ( पंजाब ) , डॉ. पवनकुमार सोनी ( लखनऊ ) , जसविंदर सिंग अरोरा ( झारखंड ) , कांचन कुमारी ( हिमाचल प्रदेश ) , योगमाता राजेश्री देसाई ( गुजरात ) , इत्यादी सन्माननीय प्रतिष्ठीतांचा मुख्यतः समावेश आहे

रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ( RTBR ) द्वारा निवडलेली व्यक्ति किंवा संस्था ह्यांना त्यांच्या द्वारा केल्या गेलेल्या किंवा भविष्यात करणार असलेल्या असाधारण कार्य – कल्पना , कार्यासंबधीच्या योजना , त्यासाठीचे कौशल्य व ते कार्य संपन्न करण्यासाठी अन्तरराष्ट्रीय कीर्तीचे प्रमाणपत्र , स्मृतीचिन्ह , मेडल व मेम्बरशिप प्रदान करून सन्मानित केले जाते

▪️ह्या अंतर्गत मुंबई येथील गुरुकृपा हार्ट सेंटर चे सुप्रसिद्ध हृदयशल्य चिकित्सक डॉ. गजानन रत्नपारखी यांना रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ( RTBR ) ह्या भूषणाने अमरावती शहरातील प्रतिष्ठित होटल राई-जिरा येथे सम्मानित करण्यात आले

▪️आजतागायत 25000 पेक्षा जास्त हृदयशल्य चिकित्सा सर्जरी / अँजिओप्लास्टी यशस्वीरित्या पूर्ण करण्याच्या अभूतपूर्व स्वास्थ्यसेवा भावाने डॉ. गजानन रत्नपारखी यांना आरटीबीआर प्रमाणपत्र , मोमेंटो , मेडल , आरटीबीआर मेम्बरशिप , इत्यादि सम्मानपूर्वक प्रदान करण्यात आले (रेकॉर्ड क्लेम आयडी – ) ( RTBR /2024 /C /1003 /58 )

▪️ह्या प्रसंगी RTBR संस्थापक तथा चीफ एडिटर डॉ. क्रांतिकुमार महाजन , चीफ एडज्युकेटर ऑफ नॅशनल ज्यूरी डॉ. एस. देवेंद्र ह्यांची उपस्थिती होती

▪️स्वास्थ्य सेवेच्या क्षेत्रात अविरत आणि अनन्यसाधारण कार्य करून लोकसेवेचे दायित्व पूर्ण करणाऱ्या डॉ. गजानन रत्नपारखी ( मुंबई ) यांना रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ( RTBR ) भूषणाने सम्मानित केल्या बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}