डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या अध्यक्षतेखाली ‘सन्मान बुद्धिमत्तेचा… मराठमोळ्या व्यक्तिमत्त्वाचा’ कार्यक्रम संपन्न
सत्कार समारंभाला अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी
▪️श्रीफलश्रुती फाऊंडेशन तर्फे मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून रविवार 25 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता, राजे संभाजी सभागृह, मुलुंड मध्ये सन्मान बुद्धिमत्तेचा… मराठमोळ्या व्यक्तिमत्त्वाचा या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
▪️मराठी माध्यमा तून शिकून संपूर्ण भारतातून तिसरे आलेले IIT Ranker प्रोफेसर श्री मंगेश शेलार व विपरीत परिस्थितीशी सामना करत CA झालेले व देशाच्या GST प्रणालीवर काम करणारे श्री शंतनु बागवे यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.
▪️सत्कार समारंभाला अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी, MBBS .MD (MED) .DM (CARD). FESC .FCSI .FSCAI. उपस्थित होते.
▪️यशस्वी होण्याचा व मराठी माध्यमातून शिकण्याचा एक आगळावेगळा फॉर्मुला सीए शंतनू बागवे यांनी सांगितला. विद्यार्थी दशेतच घरातली कामे करून, वडिलांची कंपनी अचानक बंद होऊन सुद्धा फक्त आणि फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावर कुठलीही गोष्ट साध्य करता येते याबाबत शंतनू बागवे यांनी आपले मत व्यक्त केले. शंतनु बागवे यांचे अनुभव ऐकताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते.
▪️नववीपर्यंत चक्क मारामाऱ्या करणारा विद्यार्थी, अचानकपणे पवई येथील आयआयटी संस्था पाहतो, तिच्या प्रेमात पडतो आणि तिला आपलंसं करण्याकरिता प्रचंड मेहनत व अभ्यास करून आय आय टी च्या परीक्षेत संपूर्ण देशातून तिसरा कसा येतो ? याबाबतचे अनुभव प्रोफेसर मंगेश शेलार यांनी कथन केले. परिस्थिती आणि ध्येय माणसाला यशस्वी बनवते असे शेलारांनी सांगितले.
▪️या दोघांचा सत्कार करणारे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर गजानन रत्नपारखी यांनी मराठी भाषेचा इतिहास उपस्थितांना ऐकविला. स्वतः मराठी माध्यमात शिकून, आपल्या मराठी भाषेचा आपण वैद्यकीय क्षेत्रात कसा उपयोग करीत आहोत याचे गमतीदार उदाहरण, देवून मराठी भाषे ला वृद्धिंगत करण्यासाठी उपाययोजना सांगितले .
▪️स्वतः मराठी माध्यमातून शिकून उच्च पदावर कार्यरत असलेल्या ज्या पालकांनी, आपल्या मुलांचा मराठी माध्यमात प्रवेश घेतला, अश्या पालकांचेही सत्कार या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
▪️मुलुंड मधील मराठी दुकानदारांचा व्यवसाय वाढावा या दृष्टिकोनातून मुलुंड मराठी व्यावसायिक संघाची स्थापना मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.
▪️या कार्यक्रमाला 200 हून अधिक मुंबई, ठाण्यातील अनेक मराठी शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक तसेच शिक्षक व शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते.
▪️श्री फलश्रुती च्या ह्या महान कार्याला प्रणाम.