बातम्याराजकीय

पुणे पोलिसांना सलाम, भाजप आमदाराच्या मामाचा खून एका गोष्टीवरून उलगडला.

Satish Wagh Murder Case : पुण्यातील हडपसरमध्ये भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून झाला. सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांचे अपहरण...

पुणे : पुण्यामधील हडपसर येथील भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खूनाचा उलगडा अखेर दोन दिवसांनी झाला आहे. सोमवारी पहाटे साडे सहा वाजता सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना त्यांचे बळजबरीने अपहरण करण्यात आले होते. सुरूवातीला अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासरखी पसरली, त्यानंतर त्यांचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली होती. आमदाराच्या मामाचं अपहरण करून खून झाल्याने नेमका खून कोणी केला हे काही समजले नव्हते. पुणे पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र फिरवलीत अखेर दोन दिवासांनी आरोपींना पोलसांनी अटक केली आहे. पोलिसांना एका गोष्टीचा संशय आला आणि त्या अंगानेच पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलिसांनी या प्रकरणामधील पाच पैकी चौघांना अटक केली असून त्यामधील एकजण फरार आहे.

आरोपींनी सकाळी साडे सहा वाजता सतीश वाघ यांचे अपहरण केले होते. त्यानंतर गाडीमध्येच त्यांच्या ठार करून मतृदेह शिंदवणे घाटाच्या दिशेने नेत मध्येच फेकून दिला. पुन्हा ते माघारी आले आणि फरार झाले होते. पोलिसांनी या खूनाचा उलगडा करण्यासाठी या भागातील अनेक सीसीटीव्ही तपासण्यात आले. या तपासामध्ये पोलिसांना एक गाडी घाटातून वर गेलेली असताना काही मिनिटात माघारी आल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांसाठी हा मोठा क्लू ठरला जेणेकरून त्यांना आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली.

आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीमध्ये गळा आवळून आणि लाकडी दांडक्याने मारहाण करत त्यांना संपवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश वाघ यांची त्यांच्या शेजारच्यानेच पाच लाखांची सुपारी दिली होती. चार जणांनी मिळून सतीश वाघ यांना संपवलं. यामधील सुपारी देणारा आणि आरोपींमधील तिघेजण ताब्यात असल्याचं सांगितलं. तर एकजण अजूनही फरार असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. वाघ यांच्या शेजारच्याने नेमकी कोणत्या कारणामुळे सुपारी दिली होती हे चौकशीनंतर समोर येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}