बातम्यादैवज्ञ

Daivadnya Samaj : अ. भा. दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन 19 ते 22 डिसेंबर दरम्यान पुण्यात पार पडणार आहे. दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष आणि संमेलनाध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली हा चार दिवसाचा सोहळा पार पडणार आहे.

मुंबई : अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन 19 ते 22 डिसेंबर दरम्यान पुण्यात पार पडणार आहे. दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष आणि संमेलनाध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवस हा सोहळा होणार असून श्री अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट या संस्थेने त्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. देशभरातील असंख्य दैवज्ञ बांधव या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहेत. तसेच याचवेळी दहावे दैवज्ञ साहित्य संमेलन देखील पुण्यात रंगणार आहे. (National convention of Daivagya Samaj Parishad in Pune.) दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे 21 वे राष्ट्रीय अधिवेशन आणि दहाव्या दैवज्ञ साहित्य संमेलनाचा भव्य सोहळा गुरूवारी 19 ते रविवारी 22 डिसेंबरपर्यंत पुण्यातील शुक्रवार पेठ येथील गणेश कला क्रीडा मैदानात पार पडणार आहे. गुरूवारी (19 डिसेंबर) संध्याकाळी 4 वाजता भव्य शोभायात्रा निघणार असून शुक्रवारी (20 डिसेंबर) रोजी सकाळी 8.30 वाजता उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. तसेच पद्माकरराव पांडुरंगपंत रत्नपारखी व स्व. सुमती रत्नपारखी नगरीत सकाळी 10 वाजता केंद्रीय सहकार आणि नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. गजानन रत्नपारखी व अजय कारेकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी दैसपचे उपाध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष, समाजश्रेष्ठी सुरेंद्र शंकरशेट यांच्यासह डॉ. गजानन रत्नपारखी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करणार आहेत.

रविवारी (22 डिसेंबर) संत साहित्य, प्रेरणादायी आत्मचरित्र, पत्रकारिता आणि साहित्य, नाट्य व साहित्य, ग्रंथ हंडी आदींवर मान्यवर लेखक व साहित्यिक मार्गदर्शन करणार आहेत. याचवेळी दैवज्ञ साहित्य मंच पदाधिकारी, यजमान संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार असून दुपारी तीन वाजता या चार दिवसीय अधिवेशनाचा समारोप होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष विजय कारेकर व दैसपचे सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर यांनी दिली आहे. तसेच शनिवारी सामाजिक कार्यात युवांची वानवा, ज्ञातीपत्रके व समाजप्रबोधन, कौटुंबिक जबाबदारी व महिलांचे सामाजिक योगदान, महिलांचा राजकारणातील सहभाग, वधु-वर मेळाव्यातील आजची वास्तविकता, कवी संमेलन आदी परिसंवाद होणार आहेत. यानंतर दुपारी तीन वाजता दैवज्ञ साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्य संमेलनाध्यक्ष कृष्णी वाळके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}