हिंदुत्वाचा प्रखर चेहरा आ. नितेश राणे मंत्री होणार, मंत्री मंडळ विस्ताराचा पहिला फोन नितेश राणेंना
आज मंत्रिमंडळाचा विस्तार, सिंधुदुर्गाला मानाचे स्थान.
मुंबई – विशाल कडणे : महायुतीच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. यात नवे मंत्री नागपुरातील शपथविधी सोहळ्यात शपथ घेतील. यातच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या शपथविधी सोहळ्यादरम्यान ३० ते ३२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या म्हणण्यांनुसार भाजपला या मंत्रिमंडळात २०-२१ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचा हिंदुत्वाचा प्रखर चेहरा आणि लोकांची पसंती असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच आमदार नितेश राणे यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी पहिला फोन आल्याचे समजते. तरुणांचे प्रेरणास्थान असलेले नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा विकासासाठी मंत्रिपद खेचून आणतील अशी चर्चा असतानाच नितेश राणेंना शपथ घेण्यासाठी आलेला फोन म्हणजे समस्त सिंधुदुर्गवासियांसाठी दिवाळी दसऱ्याप्रमाणेच सणासुदीची गोड बातमी आहे. प्रशासनात राणेंना मंत्रिपद दिल्याने मंत्रिमंडळात सिधुदुर्गाला मानाचे पान मिळाल्याची चर्चा आहे. केंद्रात राणे, राज्यात राणे, मंत्रिमंडळात राणे असं सर्वच वातावरण कोकणाच्या विकासाला अनुकूल असल्याने आ. नितेश राणे कोकणात विकासाची नांदी आणून सुवर्ण इतिहास घडवतील असा विश्वास कोकणातील मतदारांनी व्यक्त केला आहे. राज्यात होत असलेला मंत्रिमंडळ विस्तार कोकणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे.