बॅरिस्टर नाथ पै विद्यालयास सहशालेय स्पर्धेत ७ बक्षिसे
भांडुप शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वंदना पेडणेकर यांच्याकडून विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन
मुंबई: ठाणे (मनिलाल शिंपी) शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग व महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन तसेच अन्य स्पर्धामध्ये भांडुपच्या बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ७ पारितोषिके प्राप्त केले असून या यशाबद्दल शाळेचे कौतुक होत आहे
महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत टी वॉर्ड मधून (मोठा गट) कु प्रतीक्षा दीपक मालुसरे हिने द्वितीय क्रमांक, शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग टी वॉर्डस्तरीय विज्ञान प्रदर्शन अंतर्गत सहशालेय उपक्रम आयोजित “जाहिरात तयार करणे” स्पर्धेत कु. सायली चंदनशिवे हिने तृतीय क्रमांक, ग्रंथाली आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक तनिष तांबे द्वितीय क्रमांक- स्नेहल शिंदे तृतीय क्रमांक – स्नेहा हजारे, आदर्श विद्यालय आयोजित चित्रकला स्पर्धेत
८ वी ते १० वी गटात प्रथम क्रमांक योगिता माने तर ५ वी ते ७ वी गटात प्रथम क्रमांक प्रणव पेंडूरकर याने प्रात केला आहे या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक गोरख व्हरकटे चंद्रकांत गवस अनिल मुंढे संतोष मेढे भगवान सागर दीपक संदानशीव संतोष दावत सुनीता पाटील विजय शेडगे व मोहन शेलार यांनी मार्गदर्शन केले.
भांडुप शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वंदना पेडणेकर व शाळेचे मुख्याध्यापक अनिल बोरनारे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.