भांडुप विधानसभेचा आवाज आज विधानभवनात दुमदुमणार, आ. अशोक पाटील नागपूरमध्ये अधिवेशनासाठी दाखल
आ. अशोक पाटील यांनी केली आपल्या उत्तम अभ्यासू वृत्तीने विविध प्रश्नांची मांडणी
दैवज्ञ टाईम्स प्रतिनिधी – भांडुपमधून विक्रमी मताधिक्याने विजयश्री खेचत आणणारे भांडुपचे सुपुत्र आ. अशोक पाटील नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत . भांडुपच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट मनात तयार असण्याऱ्या आ. अशोक पाटील यांना भांडुपच्या मतदार राजाने विजयी कौल दिला आणि एकहाती विधानसभेवर पाठवले. उच्च्शिक्षित, एक उत्तम खेळाडू, लहानग्यांचा अशोक काका आणि तरुणांचा अशोक दादा अशा अनेक वैविध्यपूर्ण रूपामध्ये जनतेची सेवा करत लोकांच्या गळ्यातला ताईत झालेले आ. अशोक पाटील यांच्याकडून आता जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातच रस्ते, नाले, खेळाची मैदाने अशा अनेक प्रश्नांना सोडवून जनतेला सोयीसुविधा पुरवून देईन असे वचन मनाशी बाळगणारे आ. अशोक पाटील आज जवळपास पाच वर्षानंतर आपल्या दुसऱ्या टर्मसाठी नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. आपल्या उत्तम अभ्यासू वृत्तीने विविध प्रश्नांची मांडणी आ. अशोक पाटील यांनी आधीच तयार करून ठेवणार यात शंका नाहीच. सत्ताधारी पक्षाचा आमदार असलेले आ. अशोक पाटील अधिवेशनाच्या निमित्ताने भांडुपकरांना त्यांचे विविध प्रश्न सभागृहात मांडून न्याय मिळवूंन देतील असा आत्मविश्वास भांडुपच्या मतदार राजाने व्यक्त केला.