फोटो गॅलरीमनोरंजनमुंबई

अ. भा. नाट्य परिषद निवडणुकीत जुन्या जाणत्या मतदारांची सक्रिय प्रतिक्रिया, रंगकर्मी नाटक समूह यांचेच पारडे जड

विशाल कडणे यांच्या फेसबुक पोस्टवर रंगकर्मी झाले भावूक आणि दिला जुन्या आठवणींना उजाळा

दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी होऊ घातलेल्या अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणुकीत रंगकर्मी नाटक समूह पॅनलला समाजाच्या विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सहकार नेते विशाल कडणे यांनी आपल्या फेसबुकवरून रंगकर्मी नाटक समूह (प्रशांत दामले/दिलीप जाधव) पॅनल यांना अ. भा. नाट्य परिषद निवडणुकीत विजयी करण्यासाठी आवाहन केले होते. त्या पोस्टवर मतदार सभासदांनी आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया नोंदवत असताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. सुबोध धोत्रे नामक ज्येष्ठ सभासद जे डोंबिविलीमध्ये राहतात त्यांनी सदर फेसबुक पोस्टवर आपलं मन मोकळे केले. सुधा करमरकर आणि त्यांचे वडील यांच्या सोबत असलेले आपले नाते त्यांनी ह्या पोस्टच्या निमित्ताने सोशल मीडियावर मांडले. विशाल कडणे यांच्या पोस्टच्या माध्यमातुन ज्येष्ठ नाट्यकर्मी / सभासद पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं समाधान कडणे यांनी व्यक्त केले आहे. समाज माध्यमातून मिळणारा प्रतिसाद पाहता रंगकर्मी नाटक समूह यांचेच पारडे अ. भा. नाट्य परिषद निवडणुकीत जड असल्याचे सध्या तरी दिसत आहे. मतदार राजा काय कौल देणार हे पाहण्यासाठी आपल्या सर्वाना अजून २ दिवस वाट पाहावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}