रात्री कुटुंबासोबत जेवण सुखासमाधानानं झालं आणि औषध घेऊन जे झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सातार्याच्या फलटणमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फलटण शहरातील हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर या वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे फलटण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोघांच्या मृत्यूचं नेमके कारण समजू शकलेले नाही. हनुमंतराव रामभाऊ पोतेकर आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. वडील हनुमंतराव आणि त्यांच्या मुलाने कुटुंबासमवेत जेवण केलं, त्यानंतर आयुर्वेदिक काढा सर्वांनी घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास हनुमंतराव ,मुलगा अमित आणि त्यांची मुलगी या तिघांना त्रास होऊ लागला. त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल केलं.