मीरा भाईंदर, कल्याण, ठाणे, भिवंडी मार्गावर मेट्रो
मेट्रो १२ अर्थात कल्याण – तळोजा ते मेट्रो ५ अर्थात ठाणे – भिवंडी कल्याणला जोडण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. या मार्गासाठी निलजेपाड्यातील ११६ एकर जमीन घेण्यात आली आहे. हे मार्ग एमकमेकांना कनेक्ट झाल्यास ठाणे आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण करणं शक्य होईल. भाईंदर येथील उत्तन डेपोसाठी १४७.५ एकर जमीन घेण्यात आली आहे. या मेट्रो मार्गाची लांबी ३.२ किमी इतकी असेल. लाईन ७ए या मार्गावर दोन स्टेशन असतील, एयरपोर्ट कॉलनी आणि T2 एयरपोर्ट. आतापर्यंत या मार्गासाठीचं १५ टक्के काम पूर्ण झालं आहे. याच मार्गावर मेट्रो लाईन ९ हा मार्ग दहिसर पूर्व ते भाईंदर असेल. या मार्गाची लांबी १४.५ किमी असेल. या मार्गावर ८ स्थानकं असतील. दहिसर, पांडुरंग वाडी, मीरागाव, काशीगाव, साईबाबा नगर, मेदिटिया नगर, शहिद भगत सिंह गार्डन, सुभाष चंद्र बोस स्टेडियम अशी आठ स्टेशन्स असतील. या मार्गाचं आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. एमएमआरडीएने भाईंदरजवळील उत्तन इथे मीरा-भाईंदर आणि गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन मेट्रोच्या बांधकामासाठी आणि लाईन १२ साठी अर्थात कल्याण-तळोजा मेट्रोसाठी निलजेपाड्यातील एका जमिनीचा ताबा मिळवला आहे.