महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळात (MIDC) नोकरीची संधी!
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ (MIDC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job opportunity) विविध पदांच्या एकूण 802 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.
त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक आणि वीजतंत्री (ऑटोमोबाईल) पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
दिनांक 25 सप्टेंबर 2023 पर्यंत पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.