मनोरंजन

‘मर्डरवाले कुलकर्णी’ आज मुलुंडमध्ये, कालिदासच्या बुकिंग विंडोवर प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद

‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकात वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार पहिल्यांदा एकत्र

विनोदाच्या अफलातून टायमिंगने रसिकांचे मनोरंजन करणारे अभिनेते वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार हे विनोदाचे दोन हुकमी एक्के रंगमंचावर एकत्र येत धमाल उडविण्यास सज्ज झाले आहेत. ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकात हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. हे नाटक पाहणे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच आहे.

‘मर्डरवाले कुलकर्णी’ हे नाटक २४ नोव्हेंबरला रंगभूमीवर दाखल झाले आहे. वैभव मांगले यात मध्यवर्ती भूमिकेत असून संतोष पवार यांच्या भन्नाट दिग्दर्शनाखाली या नाटकाचा पट रंगला आहे. अष्टविनायक संस्थेचे दिलीप जाधव यांनी नाटकाची निर्मिती केली असून सहनिर्मात्या मयुरी मांगले आणि निवेदिता सराफ आहेत. संतोषची दिग्दर्शनाची अनोखी शैली आणि वैभव यांच्या अभिनयाचा हटके अंदाज ‘मर्डरवाले कुलकर्णी’ मध्ये धुमाकूळ घालत आहेत हे नक्की.

प्रेक्षकांना मनमुराद हसवण्यासाठी आम्ही सज्ज असून आमच्या दोघांची केमिस्ट्री ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकामध्ये सॉलिड धमाल आणेल, असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. एकत्र काम करताना आम्हाला खूपच मजा आल्याचे हे दोघेही सांगतात.

अष्टविनायक संस्थेच्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटकाचे लेखन जयंत उपाध्ये यांचे असून या निखळ कौटुंबिक मनोरंजक नाटकात भार्गवी चिरमुले, निमीश कुलकर्णी, सुकन्या काळण, विकास चव्हाण आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत. या नाटकाची गाणी वैभव जोशी यांनी लिहिली असून नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. प्रकाश योजना रविरसिक तर संगीत आशुतोष वाघमारे यांचे आहे.

आज रात्री ८:३० वाजता ‘मर्डरवाले कुलकर्णी’ मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात सर्व प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. कालिदासच्या बुकिंग विंडोवर पहिले असता प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद नाटकास असल्याचे बुकिंग क्लार्क कळवितात. आज कालिदास नाट्यगृहात हाऊसफूल्लचा बोर्ड पुन्हा एकदा ‘मर्डरवाले कुलकर्णी’ लावणार यां शंकांचं नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}