मनोरंजन
राकेश तळगावकर यांनी घेतली खा. विनय सहस्रबुद्धेंची भेट
श्री विनय सहस्रबुद्धे यांच्या सोबत एक क्षण...
काही वेळा फोटो घेण्याचा मोह टाळता येत नाही…. निमित्त रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित विकसित भारत@२०४७ ‘आकांक्षा चषक ‘ पथनाट्य स्पर्धा….
विनय सहस्रबुद्धे हे संसद सदस्य असून राज्यसभेमध्ये ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशी जबाबदारी आहे. तसेच ते राजकीय विचारवंत व नैमित्तिक स्तंभलेखक म्हणून सुद्धा ओळखले जातात. ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे महासंचालक आहेत. राकेश तळगावकर यांनी पथनाट्य स्पर्धेदरम्यान खा. विनय सहस्रबुद्धेंची भेट घेतली. भेटी दरम्यान खा. विनय सहस्रबुद्धें यांनी राकेश तळगावकर नाट्य क्षेत्रात करत असलेल्या उत्तम कामगिरीबद्दल कौतुक केले