राजकीयराष्ट्रीय

आ. निरंजन डावखरे यांचा वाढदिवस मुंबई आणि ठाण्यामध्ये जल्लोषात साजरा.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आ. निरंजन डावखरे यांच्या एकसमान कार्यशैलिची तरुणांना भुरळ, योगी आदित्यनाथ यांचे पुस्तक विशाल कडणेंकडून आ निरंजन डावखरे यांना भेट.

प्रतिनिधी – तरुणांना नेहमीच प्रेरणास्थानी असलेले कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांचा जन्मदिवस १५ एप्रिल रोजी समस्त ठाणे जिल्ह्यामध्ये साजरा झाला. त्यावेळी संपूर्ण मुंबई, ठाणे आणि कोकणातून आ. डावखरे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच रीघ लागली होती. वाढदिवसाच्या निमित्ताने अखिल भारतीय दैवज्ञ ब्राम्हण समाजाचे युवाप्रमुख आणि मुंबई डिस्ट्रीक हाऊसिंग फेडरेशन संचालक डॉ विशाल कडणे यांनी आ निरंजन डावखरे यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रेरणादायी प्रवास रेखाटलेले ‘The Monk who Transformed the UP – Yogi Adityanath’ हे पुस्तक भेट केले. एक साधू ज्याने उत्तरप्रदेशचे रूप पालटले अशा आशयाचे तरुणांना प्रेरणादायी असे पुस्तक सुप्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांनी लिहिले आहे. या पुस्तकामध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा धडाकेबाज प्रवास अतिशय उत्तम रित्या रेखाटला आहे. आ. निरंजन डावखरे हे नेहमीच तरुणांच्या प्रेरणास्थानी असून मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वारसा पुढे नेणारे ते भाजपच्या प्रमुख फळीतील एक महत्वाचे तरुण नेते आहेत. त्यांनी नुकतीच ठाणे ते अयोध्या अशी मोफत रेल्वे यात्रा आयोजित केली होती. आ. निरंजन डावखरे यांच्या प्रेमळ आणि विनम्र स्वभावाने त्यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान उत्तर प्रदेशातील तरुणांना देखील भुरळ घातली होती आणि त्याच प्रेमाखातीर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रेरणादायी प्रवास रेखाटलेले ‘The Monk who Transformed the UP – Yogi Adityanath’ हे पुस्तक आ. निरंजन डावखरे यांना वाढदिवसानिमित्त भेट दिल्याचे अखिल भारतीय दैवज्ञ समाजाचे युवा प्रमुख डॉ विशाल कडणे यांनी सांगितले. ह्या भेटीदरम्यान डॉ विशाल कडणे यांच्या सोबत प्रथमेश (राज) बेळलेकर, सिद्धेश बेळलेकर, राजेंद्र थेराडे, गौरव पोतदार आणि सहकारी उपस्थित होते. दैवज्ञ समाजातर्फे प्रथमेश (राज) बेळलेकर आणि सिद्धेश बेळलेकर यांनी आ. निरंजन डावखरे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}