मुंबई :ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट(IMDPCT)च्या अंतर्गत विशाल कडणे यांच्या संकल्पनेतून पहिल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयातील कार्यरत शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना ‘शिक्षक आणि स्वप्ने’ अशी असणार आहे. या स्पर्धेत परीक्षकांनी शिफारस केलेल्या आणि इतर लक्षणीय नोंदी निबंधांच्या अमूल्य संग्रहाच्या स्वरूपात ट्रस्टद्वारे पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाणार आहेत. ह्या स्पर्धेसाठी अष्टविनायक नाट्यनिर्मिती संस्थेचे दिलीप जाधव सहकार्य करत आहेत. स्मार्ट फोन च्या अतिरेकी वापरापासून सर्वाना परावृत्त करण्यासाठी अष्टविनायकच्या आज्जीबाई जोरात नाटकाने अल्पावधीतच लोकांची पसंती मिळाली आहे. त्यातच सप्टेंबर महिना शिक्षक दिन असल्याने, खास शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी ‘आज्जीबाई जोरात’च्या टीमने पुढाकार घेतला आहे. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात आज्जीबाई जोरातचे लेखक-दिग्दर्शक महाराष्ट्रातील शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. स्पर्धेसाठी निबंध पाठविण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर आहे.
दरम्यान, खास शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेच्या परीक्षकांमध्ये ट्रस्टच्या बाहेरील तीन सदस्य शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ असतील. १८ पेपर्स असतील जे कॉन्फरन्ससाठी निवडले जातील त्यांना कार्यक्रमप्रसंगी रोख रक्कमेचे पारितोषिक दिले जाईल. तेच १८ लेखक रोख पारितोषिकांसाठी पात्र असतील. या स्पर्धेत एकूण १८ रोख बक्षिसे असून कार्यक्रमात सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल.
या निबंध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृपया खालील Google फॉर्म भरून नोंदणी करा.
https://forms.gle/VjXkwZK49MwGHkJe8
सहभागी स्पर्धक खालील विषयांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी सारख्या कोणत्याही भाषांमध्ये निबंध लेखन करू शकतात:-
1. स्मार्टफोनसह विद्यार्थी
2. माझ्या शिक्षकांचा माझ्यावर कसा प्रभाव पडला?
3. शिक्षकाची खरी व्याख्या
4. मी माझ्या विद्यार्थ्यासाठी पाहिलेली स्वप्ने
5. शिक्षक म्हणून माझा पहिला दिवस
वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर आपण आपले लिखाण करू शकता.
स्वरूप/नियम:
1. पेपर/निबंध किमान 2000 शब्द आणि कमाल 3000 शब्दांचा असावा आणि 9594020888 / 9870990764 / 8652268639 वर 15.09.2024 पूर्वी ऑनलाइन सबमिट केला जावा.
2. एकाच शाळेतून कितीही शिक्षक सहभागी होऊ शकतात.
3. सहभागी कोणत्याही विद्याशाखा / विषयातील असू शकतो.
4. सहभागी वर नमूद केलेल्या विषयांपैकी कोणताही एक विषय निवडू शकतात
5. सबमिशनचे स्वरूप –
कव्हरिंग पेज (विषय, नाव आणि शाळेचा पत्ता आणि नावासह शिक्षकाचा संपर्क क्रमांक), निबंध, संदर्भग्रंथ मूल्यमापन जर असेल तर.
निबंध पीडीएफ स्वरूपात सादर करावा.
अधिक तपशिलांसाठी, तुम्ही तुमच्या समस्या 9594020888 /