विचारपूर्वक घ्या Loan Guarantor बनण्याचा निर्णय, नाहीतर तुम्हाला फेडावे लागेल कर्ज, असं नाव मागे घ्या
तुम्हाला माहित आहे का की कर्जाचा हमीदार म्हणजे लोन गॅरेंटर बनणं कधीकधी धोकादायक असू शकते? जेव्हा तुम्ही एखाद्याच्या कर्जाचे हमीदर बंता तेव्हा तुम्ही कर्जा....
नवी दिल्ली : जेव्हा एखादा मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला त्यांच्या कर्जासाठी हमीदार बनण्यास सांगतो तेव्हा आपण अनेकदा लगेच हो म्हणतो कारण आपल्याला खात्री असते की कर्जाची परतफेड वेळेवर होईल पण, तुम्हाला माहीत आहे का की कर्जाचे जामीनदार बनणे धोक्याचे ठरू शकते? कर्जाचे जामीनदार होण्यापूर्वी संभाव्य तोटे आणि खबरदारी याविषयी आम्हाला जाणून घेऊया.
कर्जाचा हमीदार बनण्याचे तोटे
जेव्हा तुम्ही एखाद्याच्या कर्ज हमीदार बनता तेव्हा, तुम्ही कर्जाची परतफेड करण्याची संपूर्ण जबाबदारी घेता. कर्जदाराने वेळेवर कर्जाची परतफेड केली नाही किंवा पैसे देण्यास नकार दिला तर बँक तुमच्याकडून कर्जाची परतफेड करण्याची मागणी करू शकते म्हणजे कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यासाठी तुम्ही जबाबदार बनाल.
अशा स्थितीत, कर्जदाराने कर्जाची वेळेवर परतफेड केली नाही किंवा मृत्यू झाला आणि कर्जाची रक्कम मोठी असेल तर कर्जाच्या हमीदाराला कर्जाची परतफेड करावी लागेल. या परिस्थितीत हमीदार देखील कर्ज घेणारा मानला जातो. कर्जाचा हमीदार होण्यापूर्वी कर्जदाराची आर्थिक स्थिती कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेशी आहे की नाही याची खात्री केली पाहिजे. कर्जदाराची आर्थिक स्थिती कमकुवत असेल तर त्याने कर्जाचे हमीदार होण्याचे टाळावे.
तुम्हालापण एखाद्याच्या कर्जाचा हमीदार व्हायचं असेल तर चांगला CIBIL स्कोर आणि आर्थिक प्रतिष्ठा असणे गरजेचे आहे. बँक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडे जामीनदार म्हणूनही पाहते. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही कारणास्तव कर्जाची रक्कम परत केली नाही, तर बँक त्याच्या देयकासाठी हमीदाराशी संपर्क साधते. अशा परिस्थितीत जर मित्र किंवा परिवारातील व्यक्तीच्या कर्जाचा हमीदार बनणार असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्या नाहीतर नंतर तुम्ही पश्चाताप करत बसाल.
हमीदार म्हणून नाव विथड्रॉ करण्याची प्रक्रिया
जर तुम्ही आधीच कर्जाचे हमीदार झाला असाल पण आता तुमचे नाव मागे किंवा विथड्रॉ करायचे असेल तर हे शक्य आहे. यासाठी तुम्हाला आणि कर्जदाराला बँकेत विनंती करावी लागेल. बँकेला दुसरा हमीदार सापडताच तुमचे नाव हमीदारांच्या यादीतून काढून टाकले जाईल.