सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी भांडुप येथील श्री सरस्वती विद्या मंदिराने चाळीस वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने चाळीस वर्षे यशोगाथेची या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेचे संचालक श्री वसंत यशवंत सावंत साहेब व संचालिका सौ वर्षा वसंत सावंत मॅडम यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने शैक्षणिक 2024-2025 या वर्षात करण्यात येत आहे त्यातील एक भाग म्हणून रविवार दिनांक 8/12/24 रविवार रोजी शैक्षणिक वर्ष 1992 ते 2010 या कालावधीत शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता येथून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण प्राप्त करून विविध क्षेत्रात आज उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत अशा विद्यार्थ्यांनी विविध उत्तम उत्तम सांस्कृतिक उदा. नृत्य ,लघु नाट्य, भारुड ,मनोगते इत्यादी कलाकृती सादर करत शाळेतील तो एक दिवस मनमुरादपणे आनंद घेत साजरा केला. बऱ्याच वर्षानंतर सर्वजण एकत्र भेटल्यामुळे प्रत्येक जण भावुक झाला होता गतकाळातील आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता झाली त्या समयी संस्थेच्या अध्यक्षांची म्हणजेच श्री वसंत यशवंत सावंत सर यांची आवर्जून आठवण काढली तसेच संस्थेच्या संचालिका सौ वर्षा वसंत सावंत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात उज्वल यश व अव्वल असल्याबद्दल अभिनंदन करून त्यांना पुढील भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या असा हा विद्यार्थी स्नेह मिलनाचा कार्यक्रम सर्व विभागांचे विभागप्रमुख तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी कोअर कमिटी सदस्य यांच्या साह्याने यशस्वीरित्या संपन्न झाला